नगर, औरंगाबादमधील 40 गावांतील शेतकरी संपावर

येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी सुरु केली आहे. 40 गावांतील शेतकरी संपावर जात आहेत. ते शेतीच करणार नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 30, 2017, 06:13 PM IST
नगर, औरंगाबादमधील 40 गावांतील शेतकरी संपावर title=

अहमदनगर : येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी सुरु केली आहे. 40 गावांतील शेतकरी संपावर जात आहेत. ते शेतीच करणार नाही.

अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या गोदावरी नदीपात्राच्या कडेच्या चाळीस गावातील शेतकऱ्यांना एकत्र करत शेतमाल पिकवायचाही नाही आणि विकायचाही नाही असा निर्णय हे शेतकरी घेताय. 

तीन एप्रिलला अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबे गावापासून या एल्गारांची सुरुवात होत आहे. आंदोलनं करुनही मात्र शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच आहे. दुसरीकडे व्यावसायिक आणि नोकरदार कामबंद संप करुन आपले प्रश्न सोडवतात. त्यामुळे आता शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. 

दरम्यान, स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी शेती करणार आहेत. आमच्या शेतीत आम्ही फक्त आमच्यासाठीच पिकवणार, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय.