मोदींच्या जाहिरातबाजीवर अजित पवारांची शेलकी टीका...

 पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या जाहिरातीचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 4, 2017, 07:23 PM IST
मोदींच्या जाहिरातबाजीवर अजित पवारांची शेलकी टीका... title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड  :  पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या जाहिरातीचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. 

मोदी एके मोदी अशा असणाऱ्या जाहिरातीवर अलीकडं एक महिला दाखविण्यात आलीये. ही महिला माझे पैसे सुरक्षित असल्याचा दावा करते. असे आशय टाकून फक्त मोदींचा सर्व काही कळत असल्याचं दाखवत, सरकार जनतेला वेडं समजतं का? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.  बँकेत कोणी चोर नसतं किंवा बँका सावकार ही नाहीत. असा टोला लगावताच सर्वत्र हशा पिकला. ते पिंपरी चिंचवड मध्ये बोलत होते. 

 कॅशलेस इंडिया करण्यासाठी कार्ड स्वॅप करण्याचा तगादा सरकारने लावलाय, मात्र या खरेदीवर दीड ते अडीच टक्के कमिशन कापले जातायेत. जो खरेदी करतो आणि जो विक्री ही करतो त्यांच्या कडून कमिशन घेतले जाणारच आहे. तुम्ही काय त्यांचे जावई नाही. असं वक्तव्य करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॅशलेस मागचे सरकारचे गुपित सर्वांसमोर ठेवले. मात्र या वक्तव्यामुळं सर्वत्र हशा पिकला.