‘मातोश्रीत बसून डरकाळ्या काय फोडता, बाहेर पडा’

सध्या, राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा कोल्हापूर मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात जाहीर भाषणात अजित पवार यांनी ठाकरे बंधुंना चांगलेच टोले हाणलेत. 

Updated: Jul 15, 2014, 03:56 PM IST
‘मातोश्रीत बसून डरकाळ्या काय फोडता, बाहेर पडा’  title=

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय... याचाच एक भाग आज कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात पाहायला मिळाला. 

कोल्हापूरच्या मेळाव्यात जाहीर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाकरे बंधुंना चांगलंच फैलावर घेतलंय. शिवसेना आणि मनसेवर टीका करताना अजित दादांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनाच आपल्या टीकेचं लक्ष्य केलंय. 

‘मातोश्रीत बसून डरकाळ्या काय फोडता... मातोश्रीतून बाहेर पडा’ असं म्हणत अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलंय. 

तर, ‘राज यांना नाशिकच्या जनतेने महापालिका दिली... मग ते काहीच सुधारणा का करू शकले नाहीत, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधलाय. ‘आधी नाशिक सुधारा, मग राज्याच्या गप्पा मारा’ असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना जोरदार टोला हाणलाय.  

आता, यावर ठाकरे बंधुंची काय प्रतिक्रिया असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.