तुम्ही फकीर असलात तरी आम्ही संसारी!

नोटबंदीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.

Updated: Dec 11, 2016, 08:24 PM IST
तुम्ही फकीर असलात तरी आम्ही संसारी! title=

जुन्नर : नोटबंदीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. तुम्ही फकीर असलात तरी आम्ही संसारी आहोत. आम्ही काय करायचं? आमच्या बायका-मुलांना पैसे लागले तर आमचा पंतप्रधान फकीर आहे, गप्प बसा असं म्हणायचं का, असा टोला अजितदादांनी लगावला आहे. 

तुम्हाला संसार करायचा नसला तरी सव्वाशे कोटी जनतेला संसार करायचा आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.