अमित शहांचा भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा, युतीबाबत उल्लेख टाळला

भाजपनं एका बाजुला महायुतीच्या जागावाटपाची चर्चा करण्याचा सूर लावला असला तरी दुस-या बाजुला मात्र स्वतंत्र प्रचार सुरू केलाय. भाजप अध्यक्ष अमित शाह प्रचारसभेतल्या भाषणांमध्ये काँग्रेसयुक्त भारतासोबत भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा दिला आहे. गावा-गावात जाऊन भाजप कार्यकर्त्यांचं जाळं सशक्त करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यात.  त्यांच्या कोल्हापूर आणि चौंडीतल्या भाषणांमध्ये महायुतीचं सरकार असा कुठेही उल्लेख नव्हता.

Updated: Sep 18, 2014, 08:50 PM IST
अमित शहांचा भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा, युतीबाबत उल्लेख टाळला title=

चौंडी, अहमदनगर : भाजपनं एका बाजुला महायुतीच्या जागावाटपाची चर्चा करण्याचा सूर लावला असला तरी दुस-या बाजुला मात्र स्वतंत्र प्रचार सुरू केलाय. भाजप अध्यक्ष अमित शाह प्रचारसभेतल्या भाषणांमध्ये काँग्रेसयुक्त भारतासोबत भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा दिला आहे. गावा-गावात जाऊन भाजप कार्यकर्त्यांचं जाळं सशक्त करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यात.  त्यांच्या कोल्हापूर आणि चौंडीतल्या भाषणांमध्ये महायुतीचं सरकार असा कुठेही उल्लेख नव्हता.

राज्यात भाजप सरकार आणा असंच ते बजावताना दिसत आहेत. त्यामुळं भाजपनं स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण केली आहे की काय अशी चर्चा आता रंगू लागलीय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह य़ांच्या उपस्थितीत आमदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेची सांगता आज अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथे झाली. त्यावेळी त्यांनी कार्य़कर्त्यांना संबोधित केले.

पंकजा मुंडे यांच्यासाठी ही संघर्ष यात्रा परिवर्तन यात्रा ठरणार आहे. भाजपच्या राज्यातल्या नेत्या म्हणून या यात्रेनंतर पंकजा मुंडे यांचा उदय होईल, असं खुद्द अमित शाह यांनी स्पष्ट केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपला राज्यात मोठा धक्का बसला होता. मुंडे यांना राज्यात मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचं स्वप्न मोदींनी पाहीलं होतं असं शाह यांनी स्पष्ट केलं. सिंदखेड राजा इथून ही यात्रा सुरू झाली. ७९ विधानसभा मतदारसंघ आणि तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून चौंडीमध्ये संघर्ष यात्रेची सांगता झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.