अमृता खानविलकर प्रचाराच्या मैदानात

नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांनी आपापल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांसह नट नट्यांचा रोड शो घेऊन मतदारांपुढे मतांचा जोगवा मागितला.

Updated: Nov 26, 2016, 11:18 PM IST
अमृता खानविलकर प्रचाराच्या मैदानात title=

यवतमाळ : नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांनी आपापल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांसह नट नट्यांचा रोड शो घेऊन मतदारांपुढे मतांचा जोगवा मागितला. यवतमाळच्या वणी येथे मराठी सिने अभिनेत्री अमृता खानविलकर हिने शिवसेना उमेदवारांसाठी रोड शो व प्रचारसभा घेऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

अमृता खानविलकरनं भर उन्हात रोड शो केला यावेळी तिच्या चाहत्यांनी विशेषतः महिला युवतींनी गर्दी केली होती. त्याचा फायदा घेत उमेदवारांनी आपला प्रचार केला.