भ्रष्टाचार निर्मुलन ही समाजसेवा नाही ?

भ्रष्ट्राचार निर्मुलन संस्थेचे नाव बदलण्यासाठी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. भ्रष्ट्राचार निर्मुलन संस्था ही अण्णा हजारे यांची संस्था आहे.

Updated: Jun 24, 2015, 07:28 PM IST
भ्रष्टाचार निर्मुलन ही समाजसेवा नाही ? title=

अहमदनगर : भ्रष्ट्राचार निर्मुलन संस्थेचे नाव बदलण्यासाठी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. भ्रष्ट्राचार निर्मुलन संस्था ही अण्णा हजारे यांची संस्था आहे.

या नोटीसमध्ये अण्णांनी त्यांच्या संस्थेच्या नावातून भ्रष्टाचार हा शब्द वगळावा, असे राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडून पाठविण्यात आलेल्या नोटीसीत नमूद असल्याचं सांगण्यात येत आहे.

 भ्रष्ट्राचार निर्मुलन संस्थेबरोबरच राज्यातील अन्य १२ संस्थांना अशा प्रकारच्या नोटीसी पाठविण्यात आल्या आहेत. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार निर्मुलन संस्थेने आजपर्यंत राज्यामध्ये अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांविरुद्ध लढा दिल्याचा इतिहास आहे.

भ्रष्ट्राचार निर्मुलनाचे काम हे कोणत्याही संस्थेचे नसून ती सरकारची जबाबदारी असते. या उलट संस्थांचे कार्य धार्मिक आणि समाजसेवेशी संबंधित असते. त्यामुळे संबंधित संस्थांनी आपल्या नावातून भ्रष्ट्राचार हा शब्द वगळावा, असे स्पष्टपणे या नोटीसीत म्हटले आहे. यासाठी अण्णा हजारे यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.