आर्चीला पाहण्यासाठी भर पावसात इस्लामपूरकर 'सैराट'

सैराट मधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरूने, इस्लामपूरकरांना अक्षरशा याड लावलं. आर्चीची एक झलक बघण्यासाठी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मध्ये भर पाऊसात तब्बल दोन तास शेकडो लोक जागेवर उभे होते. 

Updated: Aug 2, 2016, 05:48 PM IST
आर्चीला पाहण्यासाठी भर पावसात इस्लामपूरकर 'सैराट' title=

इस्लामपूर : सैराट मधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरूने, इस्लामपूरकरांना अक्षरशा याड लावलं. आर्चीची एक झलक बघण्यासाठी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मध्ये भर पाऊसात तब्बल दोन तास शेकडो लोक जागेवर उभे होते. 

शहरातील रस्ता, दुकान आणि इमारतीवर महिला आणि पुरुषांनी खचाचखच गर्दी केली होती. इस्लामपूर नगरपालिकेने बांधलेल्या अद्यावत अश्या अंबिका उद्यानाचे उद्घाटन  राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील आणि रिंकू राजगुरु यांच्या हस्ते करण्यात आले. 

चार कोटी रुपये खर्च करून तीन एकर परिसर असलेल्या या उद्यानात मिनी ट्रेन, संगीत कारंजा, गोवर्धन पर्वत, अंबिका देवीची मूर्ती, लहान मुलांसाठी खेळणी याशिवाय 1500 स्क्वे. फूट लॉन आणि वेगवेगळ्या प्रकारची 450 हून अधिक झाडे आहेत.

पाहा व्हिडिओ