कत्तलखान्यावर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना मारहाण

Last Updated: Friday, May 19, 2017 - 19:35
कत्तलखान्यावर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना मारहाण

अहमदनगर : कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात घडलीय.

संगमनेर तालुक्यातील कुरण गावातील लोकांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळतेय.  कारवाही विरोधात संपूर्ण गाव पोलिसांच्या विरोधात एकत्र झालं. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचीही बाब समोर येतेय.  

गावात सुमारे पाचशे जणांचा जमाव जमला असून गावात असलेल्या पोलिसांना बाहेर जाऊ दिलं जात नसून संगमनेरहून मदतीसाठी आलेल्या पोलिसांनाही गावात जाऊ दिलं जात नाहीय.

दरम्यान, जमावाने रस्त्यात गाड्या आडव्या लावून मार्ग रोखून धरलाय. त्यामुळे, गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

First Published: Friday, May 19, 2017 - 19:33
comments powered by Disqus