लघुशंकेस मज्जाव केला म्हणून पोलिसाला मारहाण

बदलापूर कात्रप भागातील शुभम बारच्या बाहेर सहायक पोलीस निरीक्षक मारुती कोहिनकर यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारुती कोहिनकर हे एका तरुणास लघु शंका करण्यास मनाई केल्याने मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण  केली असून या मारहाणीत कोहिनकर यांच्या डोळ्यास गंभीर दुखापत झाली असून त्यांना २० टाके पडले आहेत.

Updated: Nov 25, 2016, 04:07 PM IST
लघुशंकेस मज्जाव केला म्हणून पोलिसाला मारहाण title=

चंद्रशेखर भुयार,बदलापूर : बदलापूर कात्रप भागातील शुभम बारच्या बाहेर सहायक पोलीस निरीक्षक मारुती कोहिनकर यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारुती कोहिनकर हे एका तरुणास लघु शंका करण्यास मनाई केल्याने मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण  केली असून या मारहाणीत कोहिनकर यांच्या डोळ्यास गंभीर दुखापत झाली असून त्यांना २० टाके पडले आहेत.

काल रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास कोहिनकर हे  कात्रप भागातील  श्री साईदीप  इमारती खाली जेवणा नंतर शतपावली करत होते, त्याच वेळीस बाजूच्या शुभम हॉटेल मधून काही तरुण बाहेर पडले त्याच्यातील एक जण कोहिनकर यांच्या इमारतीच्या गेटवर लघुशंका करू लागला, त्या तरुणास कोहिनकर यांनी हटकले याचा त्याला राग त्याच्या मित्राला आला आणि त्यांनी कोहिनकर  यांना लाथा बुक्क्याने मारहाण करण्यास सुरवात केली. 

यात  कोहिनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या डोळ्याला २० टाके पडले आहेत,  कोहिनकर यांना स्पॉडिलेसिस चा त्रास असल्याने ते गेल्या एक महिन्या पासून सुट्टीवर होते आणि आजच ते कामावर रुजू होणार होते.

 मात्र काल ही घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमान विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत