शिवसेना जिल्हाप्रमुखावर हल्ला, डोळा गमावण्याची वेळ

पुणे जिल्ह्याचे शिवसेना जिल्‍हा प्रमुख रामशेठ गावडे यांच्‍यावर हल्‍ला करण्यात आलाय रामशेठ गावडे यांच्यावर १० ते १२ जणांनी कोयत्‍याने वार केले आहेत. रामशेठ गावडे यांच्यावरील हा प्राणघातक हल्ला असल्याचं सांगण्यात येतंय.

Updated: Apr 21, 2015, 03:37 PM IST
शिवसेना जिल्हाप्रमुखावर हल्ला, डोळा गमावण्याची वेळ title=

पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्ह्याचे शिवसेना जिल्‍हा प्रमुख रामशेठ गावडे यांच्‍यावर हल्‍ला करण्यात आलाय रामशेठ गावडे यांच्यावर १० ते १२ जणांनी कोयत्‍याने वार केले आहेत. रामशेठ गावडे यांच्यावरील हा प्राणघातक हल्ला असल्याचं सांगण्यात येतंय.

या हल्ल्यात रामशेठ गावडे यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे, रामशेठ गावडे यांना आपला डोळा गमवावा लागेल, असंही सांगण्यात येतंय. 

आळंदीच्‍या मरकळ रोडवरील दुपारी दोन वाजता ही घटना घडले. भोसरीच्‍या संत ज्ञानेश्‍वर रुग्‍णालयात रामशेठ गावडे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.