वांग्याचे असे झाड तुम्ही पाहिले आहे का?

Last Updated: Friday, January 20, 2017 - 08:13
वांग्याचे असे झाड तुम्ही पाहिले आहे का?

नांदेड : जेवणात वांग्याच्या भाजीचा बेत आवर्जुन ठरलेला असतो. अनेकांसाठी वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत आवडीचं. याच वांग्याचं झाडं तुम्ही पाहिलं असेलच. मात्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नांदेडमधील एक अनोखं वांग्यांच झाड.

या झाडाची उंची तुम्हाला सांगितली तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. साधारणपणे वांग्याच्या झाडाची उंची ही 4 ते 5 फूट इतकी असते. मात्र, या वांग्याच्या झाडाची उंची तब्बल 12 फूट इतकी आहे. या झाडाला दररोज किलो ते दीड किलो वांगी लागतात. 

नांदेडच्या नरसी तालुक्यातील शिवणगाव इथून सिद्धार्थ कांबळे यांनी या झाडाचे बी आणलं होतं. आपल्या घरासमोर हे बी लावून त्यांनी त्यात शेणखत आणि नियमित पाणी दिलं. आता हे झाडं 12 फूट उंचीचं झालं असून झाडाचा घेर 15 फूटाहून अधिक आहे. 

या झाडाची वांगी चवीलाही रुचकर आहेत. कांबळे यांच्या आजूबाजूच्या परिसरात हे झाड चर्चेचा विषय ठरलंय. तर कृषी अधिकारीसुद्धा अशाप्रकारच्या झाडाबद्दल पहिल्यांदाच ऐकल्याचे, कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी सांगितले.
  
विलक्षण उंची असलेले वांग्याचं हे झाड निसर्गाचा चमत्कार असल्याचं सिद्धार्थ कांबळे आणि नागरिकांना वाटतंय. त्यामुळे या वांग्याच्या झाडाचं कुतुहूल वाढत चाललंय. 

First Published: Friday, January 20, 2017 - 08:13
comments powered by Disqus