औरंगाबाद आणि नांदेड राज्यातील पहिले कॅशलेस स्टेशन

राज्यातलं पहिलं कॅशलेस रेल्वे स्टेशन होण्याचा बहुमान मराठवाड्यातील दोन रेल्वे स्थानकांना मिळाला आहे. औरंगाबाद आणि नांदेड या दोन रेल्वे स्टेशनवर आता तिकीट काढण्यापासून सामान खरेदी पर्यंत सर्व व्यवहार कॅशलेश करण्यात आले आहेत.

Updated: Mar 26, 2017, 08:28 AM IST
औरंगाबाद आणि नांदेड राज्यातील पहिले कॅशलेस स्टेशन title=

औरंगाबाद : राज्यातलं पहिलं कॅशलेस रेल्वे स्टेशन होण्याचा बहुमान मराठवाड्यातील दोन रेल्वे स्थानकांना मिळाला आहे. औरंगाबाद आणि नांदेड या दोन रेल्वे स्टेशनवर आता तिकीट काढण्यापासून सामान खरेदी पर्यंत सर्व व्यवहार कॅशलेश करण्यात आले आहेत.

बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून ९  तिकीट खिडक्या आणि स्थानकावर असलेल्या १० दुकानांमध्ये स्वाईप मशीन लावण्यात आले आहेत. शिवाय रेल्वे कॅन्टीनमध्ये पेटीएमचीही सुविधा देण्यात आली आहे. या निर्यणाचं प्रवाशांनी स्वागत केलं आहे.