औरंगाबादमध्ये स्टेट बॅंक एटीएमला आग, ११ लाखांची कॅश जळाली

येथील सुतगिरणी चौकातलं एसबीआयचं एटीएम सेंटर आगीत खाक झालंय. या आगीत एटीएम सेंटरमधील संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली आहे. शॉट सर्कीटमुळं ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय़.

Updated: Oct 21, 2015, 04:48 PM IST
औरंगाबादमध्ये स्टेट बॅंक एटीएमला आग, ११ लाखांची कॅश जळाली title=

औरंगाबाद : येथील सुतगिरणी चौकातलं एसबीआयचं एटीएम सेंटर आगीत खाक झालंय. या आगीत एटीएम सेंटरमधील संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली आहे. शॉट सर्कीटमुळं ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय़.

दरम्यान एटीएम सेंटरमधील ११ लाख रुपये मात्र आगीत जळाले नसल्याचं बँकेकडून सांगण्यात येतय.. रहिवासी इमारतीत हे एटीम आहे. आग पसरली असती तर आजूबाजूच्या दुकानांना आणि घरांनाही त्याचा फटका बसला असता. मात्र अग्निशमन दलानं वेळीच आग विझवल्यामुळं मोठी दुर्घटना टळलीय. 

पाहा व्हिडिओ : 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.