औरंगाबाद महापालिका निवडणूक: युती झाली पण आघाडीत बिघाडी

औरंगाबादमध्ये आघाडीबाबत काँग्रेस राष्ट्रवादीचा गोंधळ सुरुच आहे. त्यात राष्ट्रवादीनं आज उमेदवारांची यादी जाहीर करणार असं सांगितलं आहे. काँग्रेससमोर आघाडीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र अजून सकारात्मक उत्तर आलं नाही. 

Updated: Apr 6, 2015, 10:07 AM IST
औरंगाबाद महापालिका निवडणूक: युती झाली पण आघाडीत बिघाडी title=

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये आघाडीबाबत काँग्रेस राष्ट्रवादीचा गोंधळ सुरुच आहे. त्यात राष्ट्रवादीनं आज उमेदवारांची यादी जाहीर करणार असं सांगितलं आहे. काँग्रेससमोर आघाडीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र अजून सकारात्मक उत्तर आलं नाही. 

आता फक्त दोनच दिवस अर्ज भरण्यासाठी बाकी असल्यामुळं आज राष्ट्रवादी सगळ्या उमेदवारांची नावं जाहीर करणार, असं राष्ट्रवादीचे आमदार सतिश चव्हाण यांनी सांगितलं आहे. 

तर काँग्रेस कार्यकर्त्यांचा आघाडीसाठी विरोध आहे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेवूनच काँग्रेस योग्य तो निर्णय घेईल, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.