औरंगाबाद महापौराचा तिढा कायम, बैठकीत तोडगा नाही

औरंगाबाद महापालिका महापौरपदाचा तिढा सुटण्याची काही चिन्हं अजून दिसत नाहीत. याच मुद्यावर सकाळी मुंबईत युतीची बैठक झाली. मात्र बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहे दानवे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं. 

Updated: Apr 25, 2015, 04:17 PM IST
औरंगाबाद महापौराचा तिढा कायम, बैठकीत तोडगा नाही title=

मुंबई : औरंगाबाद महापालिका महापौरपदाचा तिढा सुटण्याची काही चिन्हं अजून दिसत नाहीत. याच मुद्यावर सकाळी मुंबईत युतीची बैठक झाली. मात्र बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहे दानवे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं. 

अडीच वर्षांचा फॉर्म्युला भाजपला मान्य नसल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलंय. महापौरपदावरुन युतीमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झालेत. शिवसेनेनं भाजपसमोर नेमका काय प्रस्ताव ठेवलाय, हे समजू शकलेले नाही. मात्र ठेवण्यात आलेल्या प्रस्तावर भाजपकडून निर्णय येण्याची प्रतीक्षा आता शिवसेना करत आहे. 

दरम्यान महापौरपदाचा तोडगा निघाला नाही तर शिवसेना आणि अपक्ष महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता आहे. शिवसेनेकेडून त्र्यंबक तुपे महापौरपदासाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून अपक्ष नगरसेवक राजू तनवानी अर्ज भरु शकतात. विशेष म्हणजे या प्रश्नी तोडगा निघाला नाही तर एमआयएमला त्याचा फायदा मिळू शकतो. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.