निवडणूक जिंकण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार, कार्यालयात काळी बाहुली

राजकीय पक्षच अंधश्रद्धेलाला खतपाणी घालत असल्याचं औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं पुढं आलंय. निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय जनता पार्टीकडून मध्यवर्ती कार्यालयात काळी बाहुली बांधण्यात आल्याचा प्रकार घडलाय. 

Updated: Apr 20, 2015, 05:31 PM IST
निवडणूक जिंकण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार, कार्यालयात काळी बाहुली title=

औरंगाबाद: राजकीय पक्षच अंधश्रद्धेलाला खतपाणी घालत असल्याचं औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं पुढं आलंय. निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय जनता पार्टीकडून मध्यवर्ती कार्यालयात काळी बाहुली बांधण्यात आल्याचा प्रकार घडलाय. 

औरंगाबादमध्ये काल्डा कॉर्नर परिसरात भाजपचं मध्यवर्ती कार्यालय आहे. याच कार्यालयात ही बाहुली आणि भोपळा बांधण्यात आलाय. एकीकडे सरकार अंधश्रद्धेला मुठमाती देत असताना सत्ताधारी भाजप अशाप्रकारे अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचा प्रकार समोर आलाय. 

यापूर्वी नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक ८४च्या उमेदवार स्नेहा पालकर यांनी प्रचार फेरी दरम्यान मतदारांवर दबाव टाकण्यासाठी बाबा बंगाली मार्गाचा अवलंब केल्याचा आरोप होतोय. अबीर गुलाल फासलेले तांदूळ, मटकी, डाळ. मतदारांच्या घरासमोरही या वस्तू टाकल्याचं पाहायला मिळालं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.