पुण्यात 3 ओला कार फोडल्यात, रिक्षाचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण

ओला-उबेर या खासगी टॅक्सींविरोधात पुकारण्यात आलेल्या रिक्षा चालकांच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागले. आरटीओ कार्यालयासमोर 3 ओला कार फोडण्यात आल्या.

Updated: Aug 31, 2016, 02:34 PM IST
पुण्यात 3 ओला कार फोडल्यात, रिक्षाचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण  title=

पुणे : ओला-उबेर या खासगी टॅक्सींविरोधात पुकारण्यात आलेल्या रिक्षा चालकांच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागले. आरटीओ कार्यालयासमोर 3 ओला कार फोडण्यात आल्या.

तोडफोडप्रकरणी पोलीस तपास करीत असून, गुन्हा नोंदविण्याचा हालचाली सुरु आहेत. ओला-उबेर टॅक्सी सेवेविरोधात पुणे-मुंबईतील रिक्षाचालकांच्या काही संघटनांनी बुधवारी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे या संपात सहभागी झालेल्या रिक्षाचालकांनी आज आपली सेवा बंद ठेवली.

आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी रोखले. दरम्यान, कोणी तोडफोड केली त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातील पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे.