काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे

काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत ही घोषणा केलीय.

Updated: Dec 23, 2014, 11:40 PM IST
काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे  title=

नागपूर : काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत ही घोषणा केलीय.

राहुल बोंद्रे, वीरेंद्र जगताप, जयकुमार गोरे, अमर काळे, अब्दुल सत्तार यांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी राज्यपालांना धक्काबुक्की झाल्याच्या कारणावरुन या पाचही आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. आता ते रद्द करण्यात आलंय.

विधानसभा विरोधीपक्षनेतेपदी काँग्रेसच्या राधाकृष्ण विखेपाटील यांची नियुक्ती करण्यात आलीये. विधानसभेचे अध्यक्ष रहिभाऊ बागडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव जाहीर केले. आणि गेल्या दिवसांपासून सुरु असलेला गोंधळ सुपुष्टात आला. मात्र विरोधकांची धार कमी करण्याची भाजपची खेळी केल्याचं बोललं जातंय. कालच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.