कल्याणमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं देशातील पहिलं स्मारक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं देशातील पहिलं स्मारक कल्याणच्या काळा तलाव इथं साकारण्यात आलं आहे. लवकरच त्याचं लोकार्पण होणार आहे. या स्मारकात बाळासाहेबांचा बावीस फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

Updated: Jan 1, 2017, 05:55 PM IST
कल्याणमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं देशातील पहिलं स्मारक title=

कल्याण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं देशातील पहिलं स्मारक कल्याणच्या काळा तलाव इथं साकारण्यात आलं आहे. लवकरच त्याचं लोकार्पण होणार आहे. या स्मारकात बाळासाहेबांचा बावीस फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

कोल्हापूरमधील शिल्पकार संताजी चौगुले यांनी हा पुतळा साकारलाय. दीड वर्षांच्या मेहनतीनंतर संताजी चौगुले यांनी हा पुतळा साकारलाय. कोल्हापुरातून हा पुतळा कल्याणच्या दिशेने रवाना झालाय. ढोलताशाच्या गजरात हा पुतळा कल्याणकडे मार्गस्थ झालाय. हा पुतळा साकारत असताना स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जातीनं या शिल्पशाळेला भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली होती.

पाहा व्हिडिओ