गांजाच्या अड्ड्यांवर नागरिकांनीच टाकली धाड आणि...

भंडारा शहरातल्या नागरिकांनी सोमवारी गांजा विक्रीच्या दोन अड्ड्यांवर धाड टाकून, ते दोन्ही अड्डे जाळले. स्वतः नागरिकांनी हे टोकाचं पाऊल का उचललं त्यामागचं कारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 

Updated: Aug 4, 2015, 09:19 AM IST
गांजाच्या अड्ड्यांवर नागरिकांनीच टाकली धाड आणि...  title=

भंडारा : भंडारा शहरातल्या नागरिकांनी सोमवारी गांजा विक्रीच्या दोन अड्ड्यांवर धाड टाकून, ते दोन्ही अड्डे जाळले. स्वतः नागरिकांनी हे टोकाचं पाऊल का उचललं त्यामागचं कारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 

भंडारा शहरातल्या म्हाडा कॉलनी तसंच ताकिया वॉर्डात नुकताच दरोडेखोरांनी घातलेल्या सशस्त्र दरोड्यात, एका महिलेची हत्त्या झाली होती. तर एका लहान मुलासह, एक तरुणी जखमी झाली होती. त्यानंतर स्थानिकांमध्ये कमालीची नाराजी होती. त्याचाच भाग म्हणून नागरिकांनी सोमवारी शहरातल्या मध्यभागी सुरु असलेल्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर धाड टाकून, तो अड्डा जाळला. 

दरम्यान, गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्यानं भाजपचे स्थानिक खासदार नाना पटोले यांनीही पोलीस प्रशासनाला खडे बोल सुनावलेत. 

भंडारा शहरात गेल्या काही वर्षांपासून गांजा विक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. त्याकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अवैध धंद्यांमुळेच शहरात गुन्हेगारी वाढल्याची स्थानिकांची तक्रार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.