शिर्डीचे रँचो | सायकलीचा वापर करून काढली दुधाची धार

जिल्ह्यातल्या संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'सायकल ऑपरेटेड मिल्कींग मशिनला राज्यस्तरावरील' द्वितीय मानांकन मिळाले आहे.

Updated: Apr 8, 2015, 08:13 PM IST
शिर्डीचे रँचो | सायकलीचा वापर करून काढली दुधाची धार title=

अहमदनगर : जिल्ह्यातल्या संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'सायकल ऑपरेटेड मिल्कींग मशिनला राज्यस्तरावरील' द्वितीय मानांकन मिळाले आहे.

कमी खर्चात तयार होणारे हे इको फ्रेंडली मशीन शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे.

दुग्धव्यवसाय हा महाराष्ट्रातील शेतीपूरक व्यवसाय असून वाढत्या महागाई बरोबरच या व्यवसायातील अडचणीही वाढत आहेत, परंतू या महागाईवर मात करत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय अल्प दरात उपलब्ध होईल असे सायकल ऑपरेटेड मिल्कींग मशिन बनवले आहे.

सदर उपकरणाला राज्य स्तरीय स्पर्धेतील द्वितीय मानांकन मिळाले आहे.

सायकलचे पॅडल, दोन फुट पंप, व्हॅक्युम व्हॉल्व्ह या साहित्याचा या उपकरणासाठी उपयोग केला गेला आहे.
केवळ सहा ते सात हजारात हे पूर्ण उपकरण तयार होत असून सायकल चालवल्या सारख पॅडेल मारून पाईपच्या सहाय्याने गाईच्या स्तनातून दूध कंटेनर मध्ये जमा होते.

या इकोफ्रेंडली उपकरणाच वैशिष्ट्य म्हणजे वीजेची बचत , इंधन बचत , ध्वनी प्रदुषणापासून मुक्ती तर सायकल चालवण्यात होणारा व्यायामही यातून होऊ शकतो.

आज जे इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुध काढण्यासाठी वापरले जातात ते जड असल्याने गाईच्या स्तनांनाही हानी पोहोचते तर दूध पूर्ण निघेपर्यंत दूध काढणाऱ्याला ते तोपर्यंत धरून बसावे लागते. 

बाजारात मिळणाऱ्या सध्याची उपकरणे ही महागडी आहेत. तुलनेत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपकरणाला धरून बसण्याची गरज नाही. हलके असलेल्या या पाईप सकरला पारदर्शी पाईप बसवले असून त्याला ऑन ऑफ स्वीच लावण्यात आल्याने ज्या स्तनातून दूध येणे बंद होते ते स्वीचच्या सहाय्याने बंद देखील करता येतात.

हे मिल्कींग मशिन दूध उत्पादक शेतकऱ्यांना अल्प दरात उपलब्ध होऊ शकेल. मेकॅनिकलच्या चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी जयदिप गाडेकर , श्रीकांत गाडेकर , शिवाजी गाडगे, वैभव वाघुडे या विद्यार्थ्यांनी हे मिल्कींग मशिन तयार केले आहे. यासाठी प्रा.नितीन तांबे , प्राचार्य जी.जे विखे यांनी मार्गदर्शन केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.