जळगावच्या महापौर निवडणुकीत भाजपचा पराभव

एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Mar 10, 2016, 11:53 PM IST
जळगावच्या महापौर निवडणुकीत भाजपचा पराभव title=

जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, खानदेश विकास आघाडीने यश मिळवून आपला गड कायम राखला आहे. त्यांना मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनक्रांती आघाडीने भक्कम साथ दिली. महापौरपदी खानदेश विकास आघाडीचे नितीन लढ्ढा तर उपमहापौरपदी मनसेचे ललित कोल्हे विजयी झाले. 

भारतीय जनता पक्षाने अल्पमत असूनही झुंज दिली, त्यांना 'मविआ' आणि अपक्ष नगरसेवकांनी साथ दिली. मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आले. दोन्ही विजयी उमेदवारांना 58 मते मिळाली, तर भाजपचे महापौदरपदाचे उमेदवार ज्योती चव्हाण आणि उपमहापौर पदाचे उमेदवार विजय गेही यांनी प्रत्येकी 17 मते मिळाली.