चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता

चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवलं आहे. काँग्रेसनं माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली पण त्यांना फारसं यश मिळवता आलेलं नाही.

Updated: Apr 21, 2017, 05:11 PM IST
चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता

चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवलं आहे. काँग्रेसनं माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली पण त्यांना फारसं यश मिळवता आलेलं नाही.

भाजपने ६६ जागांपैकी तब्बल ३६ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला अवघ्या १२ जागांवरच समाधान मानावं लागलं.

चंद्रपूर महानगरपालिका निकाल २०१७

भाजप – ३६

काँग्रेस – १२

बसपा – ०८

राष्ट्रवादी – २

शिवसेना – २

मनसे – २

प्रहार – १

अपक्ष – ३