दारूसाठी भाजप आमदारांने उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला धमकावले

भाजपचे डहाणूचे आमदार पास्कल धनारे यांनी डहाणू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचे समोर आले आहे. तेही दारुसाठी. 

Updated: Dec 8, 2016, 11:39 PM IST
दारूसाठी भाजप आमदारांने उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला धमकावले  title=

पालघर : भाजपचे डहाणूचे आमदार पास्कल धनारे यांनी डहाणू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचे समोर आले आहे. तेही दारुसाठी. 

आमदार पास्कल धनारे यांनी डहाणू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 100 बॉक्स दारू मागितल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. 

दारूचा बॉक्स पाठव नाही तर वरिष्ठांकडे तक्रार करतो, अशी धमकी धनारे यांनी पालघरचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जयवंत पाटील यांना दिली. यासंदर्भात पाटील यांनी यांनी  अधीक्षक कार्यालयात तक्रार  दिली  आहे.