भाजप आमदाराला कारावास, १० हजारांचा दंड

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभेचे भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Updated: Nov 27, 2015, 09:06 PM IST
भाजप आमदाराला कारावास, १० हजारांचा दंड title=

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभेचे भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

केळापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश हितेंद्र वाणी यांनी हा निकाल दिलाय. २०१३ साली पांढरकवडा वीज वितरण कार्यालयात घातलेला धुडगूस तोडसाम यांना भोवलाय.

राजू तोडसाम यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन अकाऊंटंट सुरेश आकोट यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच शासकीय कामात व्यत्यय आणला होता. आमदार तोडसाम यांना अटक होण्याची शक्यता असून त्यांचेवर विधानसभा सदस्य अपात्रतेची टांगती तलवार असल्याने खळबळ उडाली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.