भाजप प्रचार सभा : राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा जागा मालकाला दम

By Surendra Gangan | Last Updated: Friday, February 17, 2017 - 10:39
भाजप प्रचार सभा : राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा जागा मालकाला दम

पुणे : पुण्यात व्यंकय्या नायडू यांच्या सभेच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादाला वेगळं वळण लागलंय. हा सिव्हिलचा विषय आहे..तुम्हाला विनंती केली आहे. अन्यथा तुम्हाला काय करायचंय ते करा... केस करा... कोर्टात जा... अशा  शब्दात राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जागा मालकाला दम दिल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. 

विशेष म्हणजे पोलिसांच्या समोरच ही दमबाजी झालीये. कांबळे  दमदाटी  करत  असताना  मुंढवा  पोलीस ठाण्याचे  पोलीस हवालदार  जानमंहमद पठाण  कांबळे त्यांच्या  शेजारीच  बसले होते. कांबळे यांनी दमदाटी केल्याचा आरोप जागा मालक दिलीप बोराटे यांनी केला आहे. 

घोरपडी येथील बी. टी. कवडे रोड  येथे व्यंकय्या नायडू यांची संध्याकाळी साडे सहा वाजता सभा झाली. या सभेची जागा आपली असल्याचा दावा बोराटे यांनी केला आहे. परवानगी न घेताच सभा आयोजित केल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत केली आहे. बोराटे यांची  पत्नी  याच प्रभागातून  काँग्रेसच्या  उमेदवार  आहेत. त्यामुळे मी  भाजपच्या सभेला  जागा  कशी देईल? असा  प्रश्न  बोराटे यांनी  उपस्थित केला आहे. 

First Published: Friday, February 17, 2017 - 10:15
comments powered by Disqus