पिंपरीमध्ये भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन, रणनीतीकडे लक्ष

पिंपरी - चिंचवडमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. त्यात भाजपच्या आगामी काळातील रणनीती काय होईल या विषयी चर्चा होईलच, पण पिंपरी चिंचवड कराना काय मिळतंय आणि स्थानिक नेत्यांना काय मिळतंय या विषयी ही चर्चा सुरु झालीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2017, 10:48 PM IST
पिंपरीमध्ये भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन, रणनीतीकडे लक्ष title=

पिंपरी : पिंपरी - चिंचवडमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. त्यात भाजपच्या आगामी काळातील रणनीती काय होईल या विषयी चर्चा होईलच, पण पिंपरी चिंचवड कराना काय मिळतंय आणि स्थानिक नेत्यांना काय मिळतंय या विषयी ही चर्चा सुरु झालीय.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीचं साम्राज्य खालसा केल्यानंतर भाजपने राज्यस्तरीय अधिवेशन शहरातच भरवले आज आहे. अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला खालसा केल्यामुळंच अधिवेशन पिंपरीला होत असल्याचे पदाधिकारी सांगतायेत.

अर्थात हे राज्यस्तरीय अधिवेशन असल्यामुळं त्यात भविष्यात पक्षाची काय रणनीती असेल हेच ठरवले जाणार. पण शहरात प्रथमच मुख्यमंत्र्यांपासून संपूर्ण मंत्रिमंडळ  येणार असल्यामुळं या अधिवेशनातून शहराला काय मिळणार अशी चर्चा ही सुरु झाली आहे.

शहरवासीयांच्या दृष्टीने अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा निर्णय झाला असला तरी त्याची अंमलबजावणी कधी होणार हा प्रश्न शहरवासीयांना भेडसावत आहे. अनधिकृत बांधकामावर जो अव्वाच्या सव्वा शास्तीकर भरावा लागतो, तो रद्द होणार का हा विचार ही शहरवासीयांच्या मनात आहे.. बोपखेल रस्ता, रक्षक रस्ता यासोबतच इतरही अनेक प्रश्न शहरवासीयांपुढे आ वासून उभे आहेत. भाजपचे एवढे मंत्री आणि पदाधिकारी शहरात आलं असताना या प्रश्नातून मुक्ती मिळेल का अशी चर्चा आता सुरु झालीय. पण पदाधिकारी मात्र हमी द्यायला तयार नाहीत. 

राष्ट्रवादीचं साम्राज्य खालसा करण्यात आपण प्रचंड मेहनत घेतलीय त्याचं फळ मिळालेच पाहिजे अशी अपेक्षा भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि सहयोगी आमदार महेश लांडगे बाळगून आहेत. या दोघांनाही महापालिका विजयापासून मंत्रिपद खुणवतंय...आणि स्थानिक भाजप नेतेही तशी अपेक्षा व्यक्त करतायेत.