मुख्यमंत्री फडणवीसांची 'रक्ततुला'!

राजकारण्यांचा हार-तुरे, शाल-श्रीफळ देत सत्कार करण्याच्या प्रथेला छेद देत नागपूर महानगरपालिकेनं शुक्रवारी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'रक्ततुला' करण्यात आली... तेही कुठल्याही तराजूत न बसवता... 

Updated: Dec 20, 2014, 10:43 AM IST
मुख्यमंत्री फडणवीसांची 'रक्ततुला'! title=

नागूपर : राजकारण्यांचा हार-तुरे, शाल-श्रीफळ देत सत्कार करण्याच्या प्रथेला छेद देत नागपूर महानगरपालिकेनं शुक्रवारी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'रक्ततुला' करण्यात आली... तेही कुठल्याही तराजूत न बसवता... 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार नागपूर महानगरपालिकेनं 'रक्ततुले'ची शक्कल लढविली. पालिकेच्या सिव्हील लाइन्स भागातील मुख्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.  

यावेळी, मुख्यमंत्र्यांच्या वजना इतकं रक्तदान करण्यात आलं. यामध्ये, महापालिकेच्या एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज रक्तदान करत स्वागत समारंभाचा नवा पायंडा पाडला. हे रक्त महापालिकेच्या ब्लड बँकेत जमा करण्यात येणार आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच 'राष्ट्रीय महानगर पालिका कर्मचारी असोशिएशन'चे अध्यक्ष आहेत. फडणवीस हे नगरसेवक व नंतर महापौर असताना संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या त्यांनी हाताळल्या आहेत. त्याचमुळे, मुख्यमंत्री पदावर आरुढ झालेल्या फडणवीस यांचा सत्कार करण्याचा निर्णय संघटनेनं घेतला होता. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.