जमीन धनगर समाजाला दिली नाही म्हणून कुटुंबावर बहिष्कार

वाशीमध्ये बाळू पुजारी आणि कुटुंबीयांना जातपंचायतीने दुस-यांदा वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या मालकीची जमीन धनगर समाजाला दिली नाही, या कारणासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.

Updated: Mar 31, 2017, 06:40 PM IST
जमीन धनगर समाजाला दिली नाही म्हणून कुटुंबावर बहिष्कार title=

कोल्हापूर : वाशीमध्ये बाळू पुजारी आणि कुटुंबीयांना जातपंचायतीने दुस-यांदा वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या मालकीची जमीन धनगर समाजाला दिली नाही, या कारणासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.

10 जुलै 2013 रोजी झी मीडियानं ही बातमी सर्वप्रथम दाखवली. त्याची दखल घेत कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. यानंतर पुजारी कुटुंबीयांना न्याय मिळाला. मात्र आता जिल्हा प्रशासनाला न झुगारता पुन्हा एकदा जातपंचायतीनं बाळू पुजारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला आहे. इतकंच नाहीतर या कुटुंबाशी बोलणा-या व्यक्तीला पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागेल असा अजब फतवा जातपंचायतीनं काढलाय. दरम्यान, झी 24 तासनं याबाबत जिल्हाधिकारी अमित सैनी आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगण्यात आलं.