बाईकवरून 'पुणे ते सिंगापूर'... वेड म्हणावं की साहस!

आठ बुलेटराजे, पुणे ते सिंगापूर ही टूर सध्या पुणेकरांसाठी चांगलीच चर्चेचा विषय बनलीय. 10 हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी चक्क बाईकवर केलाय. बाईक चालवण्याची पॅशन आणि जोडीला मानवतेचा संदेश यामुळं ही सफर खास ठरली.

Updated: Dec 6, 2014, 11:00 PM IST
बाईकवरून 'पुणे ते सिंगापूर'... वेड म्हणावं की साहस! title=

पुणे : आठ बुलेटराजे, पुणे ते सिंगापूर ही टूर सध्या पुणेकरांसाठी चांगलीच चर्चेचा विषय बनलीय. 10 हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी चक्क बाईकवर केलाय. बाईक चालवण्याची पॅशन आणि जोडीला मानवतेचा संदेश यामुळं ही सफर खास ठरली.

सात देश... 10 हजार किमी अंतर... तब्बल 41 दिवसांचा प्रवास... तोही बुलेटवरुन... हा प्रवास कुण्या एका प्रोफेशनल रायडरनं केला असावा असं तुम्हाला वाटेल.. मात्र, हा हजारो किमीचा प्रवास करणारे बाईक रायडर आहेत पुण्यातले आठ उद्योजक... शशिकांत हांडे, संदीप शिंदे, विजयसिंग चव्हाण, यतीन तांबे, महेश प्रभूदेसाई, सतीश पाटील, विजय हरगुडे आणि राम फुगे अशी या बुलेटराजांची नावं आहेत.  

41 दिवसांच्या प्रवासात बाईक रायडिंग हा एकमेव उद्देश त्यांच्यापुढं नव्हता.. यावेळी त्यांनी प्रवासात मानवतेचा संदेशही दिला. या प्रवासाला त्यांनी 18 ऑक्टोबर 2014 रोजी सुरुवात केली.. त्यासाठी तीन महिन्यांचा खडतर सरावही केला.

विशेष म्हणजे मोहीम सर कराताना कोणतीही बॅकअप व्हॅन त्यांनी बाळगली नाही, ना कुठल्या बाईक रिपेअर करणाऱ्या व्यक्तीला सोबत घेतलं.. या मोहिमेत आलेल्या अडचणीनं प्रत्येकाला काही ना काही शिकवलंय...

उद्योजक म्हटलं की कामात व्यस्त, सतत नफा-तोट्याचा विचार करणारी अशी छबी डोळ्यासमोर येते. मात्र, पुण्यातल्या या आठ उद्योजकांनी बुलेटस्वारीची आवड जोपासत केलेला हा प्रवास निश्चित कौतुकास्पद म्हणावा लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.