नवी मुंबईतील तरूणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं

पामबीच मार्गालगत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललंय. तरुणीची हत्या तिच्याच नव-यानं केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी पती शाहीद अली कुरेशी याला बोईसरमधून अटक केलीय. 

Updated: Jan 28, 2015, 01:03 PM IST
नवी मुंबईतील तरूणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं title=

नवी मुंबई : पामबीच मार्गालगत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललंय. तरुणीची हत्या तिच्याच नव-यानं केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी पती शाहीद अली कुरेशी याला बोईसरमधून अटक केलीय. 

नगमाबानू कुरेशी हिचा मृतदेह  गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरला पामबीच लगतच्या झाडींमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. 

नगमानं पहिल्या नवऱ्याशी फारकत घेऊन पूर्वीचा प्रियकर शाहिद अली सोबत निकाह केला होता.मात्र शाहीद तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून झालेल्या भांडणातून ही हत्या झाली. वाशी न्यायालयानं शाहिदला २ फेब्रुवारी पर्यंतची पोलीस कोठडी ठोठावलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.