एसटी बसचा अपघात, १५ शाळकरी विद्यार्थी जखमी

अचलपूरजच्या चमक गावाजवळ एका एसटी बसला अपघात झालाय. बस उलटल्यामुळं १५ जणं जखमी झाले आहेत. 

Updated: Nov 20, 2014, 12:48 PM IST
एसटी बसचा अपघात, १५  शाळकरी विद्यार्थी जखमी  title=

अमरावती: अचलपूरजच्या चमक गावाजवळ एका एसटी बसला अपघात झालाय. बस उलटल्यामुळं १५ जणं जखमी झाले आहेत. 

सकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात घडला. शाळेत जाण्यासाठी गावावरून विद्यार्थी या बसनी येत होते. १५ विद्यार्थी यात जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

जखमींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.