...आणि संतप्त जमावाने बसच पेटवून दिली

बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे संतप्त जमावाने बस पेटवून दिल्याची घटना नागपुरात घडलीये. 

Updated: Mar 20, 2017, 08:51 PM IST
...आणि संतप्त जमावाने बसच पेटवून दिली

नागपूर : बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे संतप्त जमावाने बस पेटवून दिल्याची घटना नागपुरात घडलीये. 

नागपुरातल्या कामठी रोडवरची ही रात्रीची घटना आहे. त्यानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. नागपुरे ते कामठी रोडवर रविवारी उशिरा रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना स्टार बसने जोरदार धडक दिली. 

या धडकेत दुचाकीवरील दोघेंही तरुण गंभीर झाले. अपघात झाल्याने घटनास्थळावर मोठी गर्दी जमली. स्टार बसमधील प्रवाशांना खाली उतरवून उपस्थित जमावाने स्टार बस पेटवून दिली. जखमींना मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जमावाला पांगवलं. अग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत बस जवळपास संपूर्ण जळून राख झाली. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.