उद्योजक सतीश रसाळ यांच्या हत्येचा उलगडा

कल्याण-शिळ मार्गावरील निळजे येथील उद्योजक सतीश रसाळ यांच्या हत्येचा उलगडा झाला. 

Updated: Sep 14, 2016, 12:05 AM IST
उद्योजक सतीश रसाळ यांच्या हत्येचा उलगडा title=

ठाणे : कल्याण-शिळ मार्गावरील निळजे येथील उद्योजक सतीश रसाळ यांच्या हत्येचा उलगडा झाला. 

पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून चुलत भाऊ जयदीप यानं सतिशचा काटा काढल्याचं उघड झाले आहे. या प्रकरणी जयदीपसह हत्येला शस्त्र पुरवणारा मांत्रिक परशुराम पाटील, ड्रायव्हर चंदन गायकवाड यांनाही अटक करण्यात आली.

या सर्वांना 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ९ सप्टेंबरला सतीश रसाळ यांचा मृतदेह कल्याण-शिळ मार्गावर सोनारपाडा गावाजवळ झायलो कारमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. लुटीच्या इराद्याने हत्या केल्याचा बनावही रचण्यात आला होता.