भाजप आमदाराची आमदारकी रद्द, कोळींची सर्वोच्च न्यायालयात धाव

आमदारकी रद्द केल्याच्या निकालाविरोधात डॉ. देवराव होळी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. गडचिरोलीचे भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांची शासकीय सेवेत असताना भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

Updated: Jan 21, 2017, 11:08 AM IST
भाजप आमदाराची आमदारकी रद्द, कोळींची सर्वोच्च न्यायालयात धाव title=

गडचिरोली : आमदारकी रद्द केल्याच्या निकालाविरोधात डॉ. देवराव होळी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. गडचिरोलीचे भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांची शासकीय सेवेत असताना भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. शासकीय सेवेत असताना शासकीय निधीचा अपहार केल्या प्रकरणी डॉ होळी यांच्यावर गुन्हा दाखल होता. 

विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. पण तो मंजूर झाला नसताना, डॉ होळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि जिंकूनही आले. मात्र त्यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावर निकाल देताना नागपूर खंडपीठानं होळी यांना अपात्र ठरवत त्यांची आमदारकी रद्द केली.

आता ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयानं हा निकाल दिल्यामुळं भाजपला मोठा धक्का बसलाय. मात्र पक्ष होळी यांच्यासोबत असल्याचं भाजप खासदार अशोक नेते यांनी म्हटलंय. तर याचिकाकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.