सीबीएसई बोर्डाचा खासगी शाळांना दणका

पुस्तके,स्टेशनरी,स्कूल बॅग अशा सगळ्याच गोष्टी शाळेतून घ्याव्यात अशी सक्ती शाळा करु शकत नाही.

Updated: Apr 21, 2017, 01:12 PM IST
सीबीएसई बोर्डाचा खासगी शाळांना दणका

मुंबई : पुस्तके,स्टेशनरी,स्कूल बॅग अशा सगळ्याच गोष्टी शाळेतून घ्याव्यात अशी सक्ती शाळा करु शकत नाही. शाळा समाजहितासाठी असल्या पाहिजेत ना की पैसे कमवण्याचे साधन असं म्हणत सीबीएसईने शाळांना सक्त ताकीद दिली आहे. 

सीबीएसईने देशभरातल्या पालकांच्या तक्रारींची दखल घेत हे आदेश नव्याने जारी केले आहेत. कोणतीही शाळा असं करत असेल तर सक्त कारवाई करण्यात येईल असेही आपल्या आदेशात सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

सीबीएसईच्या या निर्णयाने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक रुपये पालकांना यासाठी शाळेत भरावे लागत होते.