मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार, अडीच तास खोळंबा

मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. अडीच तासांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड लाईन तुटली होती मात्र अद्यापही मध्य रेल्वेची वाहतूक सुरु झालेली नव्हती.

Updated: Jan 22, 2015, 09:04 AM IST
मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार, अडीच तास खोळंबा title=

ठाणे : मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. अडीच तासांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड लाईन तुटली होती मात्र अद्यापही मध्य रेल्वेची वाहतूक सुरु झालेली नव्हती.

मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. ठाण्याजवळ आज पहाटेच ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे तब्बल ३ तास डाऊन स्लो मार्गावरची वाहतूक बंद होती.

बिघाड दुरुस्त करायला रेल्वेला तब्बल ३ तास लागले. यामुळे अप मार्गावरील गाड्याही सुमारे अर्धा तास विलंबानं धावतायत. परिणामी ऑफीसला निघालेल्या उपनगरातल्या नोकरदारांचे चांगलेच हाल होतायत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.