बातमी तुमच्या कामाची: ताडोबा भ्रमंतीसाठी आता खास मिनीबसची सुविधा

चंद्रपूरमधला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी जाणाऱ्या आता पर्यटकांसाठी आनंदाची बातमी... ताडोबाच्या भ्रमंतीसाठी आता चंद्रपूर शहरातूनच मिनीबसची सुविधा सुरू झालीय. 

Updated: Aug 16, 2015, 06:41 PM IST
बातमी तुमच्या कामाची: ताडोबा भ्रमंतीसाठी आता खास मिनीबसची सुविधा  title=

चंद्रपूर: चंद्रपूरमधला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी जाणाऱ्या आता पर्यटकांसाठी आनंदाची बातमी... ताडोबाच्या भ्रमंतीसाठी आता चंद्रपूर शहरातूनच मिनीबसची सुविधा सुरू झालीय. 

अवघ्या दोनशे रुपयांत ही एक दिवसाची सफर करता येणार आहे. दिवसातून दोन वेळा ही सुविधा उपलब्ध होणार आहे... ही बस चंद्रपूर शहरातून वर्षभर सोडली जाणार असल्याने जंगल भ्रमंतीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी सामान्य पर्यटकांना खर्चिक ताडोबाच्या भ्रमंतीतून स्वातंत्र्य मिळाले आहे. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.