वाड्यांचं पुणं होणार गगनचुंबी, नवे डीसी रूल प्रसिद्ध

राज्य सरकारने पुण्यासाठी नवीन डीसी रुल्स गुरुवारी प्रसिद्ध केले आहेत.

Updated: Jan 20, 2017, 08:35 PM IST
वाड्यांचं पुणं होणार गगनचुंबी, नवे डीसी रूल प्रसिद्ध  title=

पुणे : राज्य सरकारने पुण्यासाठी नवीन डीसी रुल्स गुरुवारी प्रसिद्ध केले आहेत. या डीसी रूलमध्ये जुन्या वाड्यांचा विकास करण्यासाठी तीन एफएसआय देण्यात येणार आहे. यामुळे पुण्यातल्या धोकादायक झालेल्या वाड्यांच्या विकासाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

एफएसआयच्या या खैरातीमुळे बांधकामं वाढणार हे निश्चित आहे, पण केवळ बांधकामं वाढवणं म्हणजे विकास नव्हे अशी टीका होतेय. वाढणारी बांधकाम आणि त्यामुळं वाढणारी लोकसंख्या यासाठी लागणाऱ्या नागरी सुविधांचा देखील विचार डीसी रुल मध्ये व्हायला हवा होता, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे डीसी रुल्स म्हणजे निवडणुकीच्या पार्शवभूमीवर बिल्डरांना खुश करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधकांनी केलीय. भाजपन हे आरोप फेटाळलेत. मेट्रोच्या बाजूला चार एफएसआय देण्यास राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण आणि भाजपाचाही विरोध होता.

पाहा काय आहे नव्या डीसी रूलमध्ये

बीआरटी मार्गांच्या बाजूलाही चार एफएसआय

पीएमपीएल- एसटीच्या जागा किंवा डेपो विकसित करण्यासाठी जादा एफएसआय

राज्य शासन- महापालिकेच्या मालकीच्या वसाहतींना चार एफएसआय

शासकीय- निमशासकिय कार्यालयांच्या त्याच जागेत विस्तारीकरणाचाही मार्ग मोकळा

मेट्रोच्या दोन्ही बाजूंना पाचशे मीटर पर्यंत चार एफएसआय मिळणार

नदी काठावरील ब्लु लाईनच्या आतील जागेचाही आता वापर करता येणार

 या जागेचा फक्त सार्वजनिक स्वछता गृह, खुली मंडई, पार्किंग, उद्यानं अशी लोकउपयोगी कामाचं करता येणार

रेड लाईन आणि ब्लु लाईन मधील जुन्या बांधकामाचा पुनर्विकास करण्याची देखील परवानगी

पुनर्विकास करताना या इमारतींना बेसमेंटची उंची वाढवावी लागणार

झोननुसार टीडीआर वापराची अट शिथील  

एफएसआय आणि टीडीआरला आता क्रेडिट बॉण्डचा पर्याय