बिरसी गावाजवळ विमान कोसळलं, २ ठार

बिरशी विमानतळावरून पायलट प्रशिक्षण देणारं चार्टड विमान कोसळलं आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 26, 2017, 12:20 PM IST
बिरसी गावाजवळ विमान कोसळलं, २ ठार title=

गोंदिया : गोंदिया येथील बिरशी विमानतळाच्या पायलट प्रशिक्षण देणारं चार्टड विमान कोसळलं आहे. 

गोंदियाच्या धापेवडमध्ये हे विमान कोसळलं, यात २ जणांचा मृत्यू झाला आहे, यात १ महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. 

पुरूष प्रशिक्षकाकडून महिला विद्यार्थी विमानाचं प्रशिक्षण घेत असताना हा अपघात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे.