मुख्यमंत्र्यांच्या सभेत अखिल भारतीय छावा संघटनेचा गोंधळ

नगरपालिकांच्या दुस-या टप्प्याचं मतदान 18 तारखेला होतंय.. या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. कालच्या बारामती दौर-यानंतर आज मुख्यमंत्री मराठवाड्यात सभांचा धडाका लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पैठणमधल्या सभेत अखिल भारतीय छावा संघटनेनं गोंधळ घातला.

Updated: Dec 11, 2016, 04:05 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या सभेत अखिल भारतीय छावा संघटनेचा गोंधळ  title=

पैठण : नगरपालिकांच्या दुस-या टप्प्याचं मतदान 18 तारखेला होतंय.. या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. कालच्या बारामती दौर-यानंतर आज मुख्यमंत्री मराठवाड्यात सभांचा धडाका लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पैठणमधल्या सभेत अखिल भारतीय छावा संघटनेनं गोंधळ घातला.

मराठा आरक्षणाबाबत यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. यानंतर लातूर जिल्ह्यातही मुख्यमंत्र्यांची सभा होती आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 4 नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजपनं या ठिकाणी चांगलाच जोर लावला आहे.