मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी संघाच्या गणवेशात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवासाठी रेशिमबाग सज्ज झालीय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी हे देखील गणवेशात उपस्थीत आहेत. 

Updated: Oct 22, 2015, 10:22 AM IST
मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी संघाच्या गणवेशात  title=

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवासाठी रेशिमबाग सज्ज झालीय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी हे देखील गणवेशात उपस्थीत आहेत. 

संघाचा विजयादशमीचा उत्सव राजकीय वर्तुळात एक मोठा चर्चेचा विषय असतो. देशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरसंघचालक या दिवशी संघाची भूमिका स्पष्ट करतात. देशातली सध्याची परिस्थिती पाहता आज होत असलेल्या या उत्सवाला महत्त्व प्राप्त झालंय. 

१९२५ मध्ये विजया दशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. तेव्हापासून विजया दशमीच्या कार्यक्रमाची आणि सरसंघचालकांच्या भाषणाची ही परंपरा ९० वर्ष अखंड सुरू आहे. सकाळीच रेशीमबागेतल्या संघ मुख्यालयात पथसंचलन करण्यात आलं. थोड्याच वेळात मोहन भागवत दसऱ्याच्या बौद्धिकाला सुरूवात करतील. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.