मुख्यमंत्री आज जालना दौ-यावर, विकास कामांची करणार पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौ-यावर आहेत. दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्र्यांच्या दौ-याला सुरूवात होईल. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 13, 2017, 07:58 AM IST
मुख्यमंत्री आज जालना दौ-यावर, विकास कामांची करणार पाहणी title=

जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौ-यावर आहेत. दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्र्यांच्या दौ-याला सुरूवात होईल. 

या दौ-यात मुख्यमंत्री जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील खासगाव आणि सिंधी गावात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची पाहणी करणार आहेत. तर खासगावात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची देखील ते पाहणी करणार आहेत. 

दरम्यान जाफ्राबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक देखील पार पडणार आहे. या बैठकीनंतर ते जालना शहराकडे प्रयाण करणार आहेत. 

येथे पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना होतील.