मुख्यमंत्र्यांच्या गावी सुरक्षा वाऱ्यावर, दुकानदारांनी हाती घेतल्या काठ्या

नागपुरातल्या कायदा आणि व्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होत असतानाच, आता पोलीस व्यवस्थेवरून भरोसा उडालेल्या नागपूरकर व्यापाऱ्यांनी आपली सुरक्षा स्वतःच करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापाऱ्यांनी आपल्या भागातल्या दुकानदारांना मोठ्या प्रमाणात काठ्या वाटल्यात.

Updated: Mar 20, 2015, 03:19 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या गावी सुरक्षा वाऱ्यावर, दुकानदारांनी हाती घेतल्या काठ्या title=

नागपूर : नागपुरातल्या कायदा आणि व्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होत असतानाच, आता पोलीस व्यवस्थेवरून भरोसा उडालेल्या नागपूरकर व्यापाऱ्यांनी आपली सुरक्षा स्वतःच करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापाऱ्यांनी आपल्या भागातल्या दुकानदारांना मोठ्या प्रमाणात काठ्या वाटल्यात.

या भागात सुमारे ७०० दुकानदार आहेत. त्यापैकी ४५० पेक्षा जास्त दुकानदारांना, इथल्या दुकानदारांच्या संघटनेनं या प्रकारच्या लाठ्या वाटल्या आहेत. इतकेच नव्हे तर इथल्या दुकानदारांनी CCTV कॅमेरे सुद्धा बसवले आहेत. शिवाय लवकरच सर्वांसाठी शिट्या आणि अलार्मचीही सोय केली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातच, पोलिसांचा गुंडांवर धाक नसल्याचं हे बोलकं चित्र आहे. गेल्या काही महिन्यांत नागपूरमधलं गुन्हेगाराचं प्रमाण कमालीचं वाढलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.