'म्हाडा'त घर हुकलं?, 'सिडको'ची लॉटरी आली

 म्हाडाच्या नुकत्याच झालेल्या लॉटरीत ज्यांना घर लागलं नाही, त्यांच्यासाठी एक नवीन संधी पुन्हा चालून आली आहे.  

Updated: Jul 9, 2014, 08:15 AM IST
'म्हाडा'त घर हुकलं?, 'सिडको'ची लॉटरी आली title=

नवी मुंबई :  म्हाडाच्या नुकत्याच झालेल्या लॉटरीत ज्यांना घर लागलं नाही, त्यांच्यासाठी एक नवीन संधी पुन्हा चालून आली आहे. कारण नवी मुंबईत सिडकोतील खारघर सेक्टरमधील सेक्टर 36 मध्ये स्वप्नातलं घर मिळण्याची एक संधी आता सिडकोने ठेवली आहे. 

सिडकोने नव्या लॉटरीच्या माध्यमातून 3 हजार 250 घरे उपलब्ध केली आहेत.

अल्प उत्पन्न गटात येणाऱ्या नागरिकांसाठी 2 हजार 590 फ्लॅट आहेत. हे फ्लॅट 340 चौरस मीटरचे आहेत, या फ्लॅटची किंमत 23 लाख 93 हजार रूपये ठेवण्यात आली आहे. सिडकोने या लॉटरीची अनामत रक्कम 50 हजार रूपये ठेवली आहे.
 
तसेच 280 चौरस मीटरच्या 704 फ्लॅट या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. या फ्लॅटची किंमत 15 लाख 78 हजार 300 रूपये आहे. या योजनेत घरासाठी अर्ज दाखल करताना 25 हजार रुपये डिपॉझिट द्यावी लागेल.
 
सिडकोकडून या घरांची फॉर्म विक्री 22 जुलैपासून सुरू होणार आहे. सिडकोने अर्जाची किंमत 50 रूपये ठेवलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.