नाशकात दीड वर्षात बनावट नोटा चलनात आणण्याच्या २१ घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे देशभरात काळ्या पैशांची चर्चा सुरु आहे. बेहिशोबी पैशांबरोबरच बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रकार उघडकीस आल्याने सरकारला हा निर्णय घ्यावा लागलाय. नाशिक शहरात गेल्या दीड वर्षात बनावट नोटा चलनात आणण्याच्या २१ घटना उघडकीस आल्यात. 

Updated: Nov 13, 2016, 11:05 PM IST
नाशकात दीड वर्षात बनावट नोटा चलनात आणण्याच्या २१ घटना  title=

मुकुल कुलकर्णी, नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे देशभरात काळ्या पैशांची चर्चा सुरु आहे. बेहिशोबी पैशांबरोबरच बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रकार उघडकीस आल्याने सरकारला हा निर्णय घ्यावा लागलाय. नाशिक शहरात गेल्या दीड वर्षात बनावट नोटा चलनात आणण्याच्या २१ घटना उघडकीस आल्यात. 

देशाच्या अर्थ व्यवस्थेला सर्वात मोठा धोका कोणाकडून असेल तर तो बनावट चलनी नोटांपासून. देशांतर्गत गुन्हेगार असो किवा सिमेपलीकडून भारतात दाखल होणारे आतंकवादी यांनी वेळोवेळी बनावट नोटा चलनात आणून भारतीय अर्थ व्यवस्था खिळखिळी तर केलीच आहे. शिवाय आपले मनसुबेही साध्य केलेत. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकीकडे करन्सी नोट प्रेस आहे. ज्या माध्यमातून अधिकृत चलनि नोटा छापल्या जातायेत तर दुसरीकडे बनावट नोटा छापणार्या  टोळी कार्यरत असल्याचे वेळोवेळी उघडकीस आलेय. 

शहर पोलिसांनी गेल्या दीड वर्षात एक दोन नव्हे तर तबल २१ वेळा बनावट नोटा चलनात आणण्याच्या घटना उघडकीस आणल्यात. यात सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ८, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७, पंचवटी गंगापूर रोड पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन तर नव्यानेच सुरु झालेल्या म्हसरूळ आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक एक गुन्हा उघडकीस आलाय. याप्रकरणी पोलिसांनी संशयित गुन्हेगार बरोबरच नकली नोटा बनविण्याच्या साहित्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पाचशे आणि दोन हजार रूपाच्या नव्यानोटा बाजारात आणल्या जात असल्या तरी भविष्यात तशाच बनावट नोटा चलनात आणण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाय योजले जाणार आहेत. तसंच नागरिकांनीही नोटा हाताळताना अस्सलतेची खात्री करावी. जास्तीत जास्त कँशलेस व्यवहार करावेत, असा सल्ला गुंतवणूक सल्लागार देत आहे.

जोपर्यंत नागरिक सतर्क राहणार नाहीत तोपर्यंत सरकरी मोहिमांना यश मिळणं शक्य नाही. म्हणूनच अर्थ व्यवस्थेला लागेलेली किड दूर करण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहून खारीचा वाटा उचलण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.