राष्ट्रवादीला पाणी पाजणार, बारामतीत मुख्यमंत्र्यांची गर्जना

शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची सभा

Updated: Dec 11, 2016, 09:03 AM IST
राष्ट्रवादीला पाणी पाजणार, बारामतीत मुख्यमंत्र्यांची गर्जना title=

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात बारामतीत मुख्यमंत्र्यांची सभा होती. यावेळी मुख्यमंत्री यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसवर निशाणा साधत राष्ट्रवादीला पाणी पाजणार अशी  टीका केली. अत्यंत चुरशीची लढत असलेल्या बारामती नगरपालिका  निवडणूकीच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री बारामतीत आले होते. त्यांच्या बरोबर  राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे उपस्थित होते.

बारामतीत भाजप, शिवसेना, रासप या पक्षांनी बारामती विकास आघाडीची स्थापना करून  सत्ताधारी  राष्ट्रवादी कॉग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण केल आहे. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने पवारांच्या बुरजाला छेद देण्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.