मुख्यमंत्र्याची सुरक्षा म्हणजे काय पोरखेळ आहे का?

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा नंदुरबार पोलिसांनी अक्षरशः खेळ केला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 1, 2017, 12:37 PM IST
मुख्यमंत्र्याची सुरक्षा म्हणजे काय पोरखेळ आहे का? title=

नंदुरबार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा नंदुरबार पोलिसांनी अक्षरशः खेळ केला. आरोग्य शिबीरसाठी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस नंदुरबारमध्ये आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या डी झोन मध्ये सर्रास ड्रोन कॅमरा उडविण्यात आला इतकच नव्हे, तर कॅमेरा लावण्यात आलेली क्रेनही याच डी झोनमध्ये लावण्यात आली होती. 

अनेक अनधिकृत व्यक्ती या डी झोनमध्ये सर्रास फिरत होते. अनेकांकडे पोलिसांचे सुरक्षा पासही नव्हते. विशेष म्हणजे हे सुरक्षेचे तीन तेरा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांच्या उपस्थितीत वाजले. 

चौबे महाशयांना सुरक्षेच्या या निष्काळजीपणाबद्दल विचारले असता आपण पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधा असे कामचलाऊ उत्तर त्यांनी दिले. या ठिकाणी उडत असेलेला ड्रोन कॅमेरा तर मुख्यमंत्र्यापासून अवघ्या काही फुटावर उडत होता. 

एक क्षण तर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन उडता ड्रोन कॅमेरा अतिशय जवळ आल्याचं बघून विचलित झाल्याचं दिसून आले. पोलीस यंत्रणेने मुख्यांत्रांच्या डी झोनमध्ये इतक्या लोकांना अनधिकृत प्रवेश देऊन ठेवला होता कि त्या सुरक्षा कड्याला काही महत्वच उरल नव्हतं.