मुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच निवडणूक लढतील?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार, याबाबत चर्चा रंगली असताना त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी मुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच लढतील असे संकेत दिलेत. 

Updated: Sep 17, 2014, 06:27 PM IST
मुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच निवडणूक लढतील?  title=

कराड, सांगली: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार, याबाबत चर्चा रंगली असताना त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी मुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच लढतील असे संकेत दिलेत. 

पिंपरीमध्ये महिला काँग्रेसच्या कार्यक्रमाला त्या आल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री दक्षिण कराडमधून लढणार आहेत, त्यांना महाराष्ट्र भर प्रचार करायचा आहे, तुम्ही त्यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर सत्वशिला यांनी ही शक्यता फेटाळून न लावता आपण त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळू असं उत्तर दिलं.

त्यामुळं मुख्यमंत्री दक्षिण कराडमधूनच मैदानात उतरण्याच्या चर्चेला बळकटी मिळाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विरोधक आणि आघाडीतील पक्षांच्या नेत्यांकडून होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. ज्या व्यक्तीबरोबर सर्वाधिक कालावधी घालवला, ती व्यक्ती महिलेलाच चांगली कळू शकते. मी त्यांची पत्नी असून त्यांच्या प्रामाणिकपणावर माझा पूर्ण विश्वास आहे.
 
मुख्यमंत्री राज्यात प्रचार करताना त्यांचा मतदारसंघात प्रचार करण्यासाठी संपूर्ण कुटुंब उरतले आहे. आपल्या कुटुंबाची ही परंपरा सासू-सासऱ्यांपासून आहे, असंही त्यांनी सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.